राष्ट्रपती निवडणूक : अजूनही खेळ संपलेला नाही म्हणत ममतांनी टोचले भाजपचे कान

ज्यांच्याकडे देशातील एकूण आमदारांच्या निम्मेही आमदार नाहीत त्यांनी मोठ-मोठ्या गोष्टी बोलू नये.
Mamta Banerjee
Mamta BanerjeeSakal

नवी दिल्ली : चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) विजय मिळवूनही भाजपाला आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकणे सोपे नाही, असे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी बुधवारी केले आहे. एवढेच नव्हे तर, भारपाकडे एकूण आमदारांपैकी निम्मेही आमदार नसून देशभरात विरोधी पक्षांकडे जास्त आमदार असल्याचेही बॅनर्जी म्हणाल्या. (Mamata Banerjee On President Election)

Mamta Banerjee
दरेकरांना दिलासा देण्यास HC चा नकार; अटकेची टांगती तलवार?

अजूनही खेळ संपलेला नाही, असे सांगून बॅनर्जी म्हणाल्या की, ज्यांच्याकडे देशातील एकूण आमदारांच्या निम्मेही आमदार नाहीत त्यांनी मोठ-मोठ्या गोष्टी बोलू नये. आमच्या पाठिंब्याशिवाय भाजप पुढे जाणार नाही, हे विसरू नये असा सल्लादेखील बॅनर्जी यांनी भाजपला दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासारखे राजकीय पक्ष पराभूत होऊनही मागील निवडणुकीपेक्षा अधिक मजबूत झाल्याचेही त्या म्हणाल्या.

देशातील एकूण आमदारांपैकी निम्मेही आमदार भाजपकडे नसल्याचे यावेळी राष्ट्रपतीपदाची निवडणूक भाजपसाठी सोपी असणार नाही. देशभरात विरोधी पक्षांचे आमदार जास्त आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका अप्रत्यक्षपणे इलेक्टोरल कॉलेजच्या माध्यमातून घेतल्या जातात. त्यात संसदेचे, राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य असतात असे त्यांनी सांगितले. देश केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी लढण्याची तयारी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com