राष्ट्रपतींनी रद्द केली राष्ट्रपती भवनातील इफ्तार पार्टी

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

कर भरणाऱ्या जनतेच्या पैशांवर अशा प्रकारचे धार्मिक सणांचे आयोजन करणे व त्यावर खर्च करणे हे गैर आहे, असेही कोविंद यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावर्षी राष्ट्रपती भवनातील होणारी इफ्तार पार्टी बुधवारी (ता. 6) रद्द केली. राष्ट्रपती भवन हे धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे धर्म आणि शासन हे वेगळे ठेवणे गरजेचे आहे, याच कारणामुळे आता राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होणार नाही असे राष्ट्रपतींनी जाहीर केले आहे.

त्याचबरोबर कर भरणाऱ्या जनतेच्या पैशांवर अशा प्रकारचे धार्मिक सणांचे आयोजन करणे व त्यावर खर्च करणे हे गैर आहे, असेही त्यांनी सांगितले. 

माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीही 2002 ते 2007 या सालात राष्ट्रपती भवनातील इफ्तार पार्टीची परंपरा रद्द केली होती. यांच्या शिकवणीला अनुसरूनच यावर्षीही इफ्तार पार्टी व असे धार्मिक सण राष्ट्रपती भवनात होणार नाहीत, अशी माहिती कोविंद यांनी इंडीयन एक्सप्रेसला दिली. या इफ्तार पार्टीवर खर्च होणारा पैसा हा अनाथालयात वाटण्यात येईल. 2017 मध्ये कोविंद यांनी राष्ट्रपती भवनाची सूत्रे हाती घेतल्यावर ख्रिसमस ही साजरा केला नव्हता. 

कलामांनंतर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी इफ्तार पार्टीची परंपरा पुन्हा सुरू केली व प्रणव मुखर्जींनी ती चालू ठेवली. 

 

Web Title: President Ram Nath Kovind cancel annual Iftar party at Rashtrapati Bhavan