
उत्तर प्रदेशातील आयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. या बांधकामासाठी निधी गोळा करण्याची मोहिम शुक्रवारपासून सुरू झाली आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील आयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. या बांधकामासाठी निधी गोळा करण्याची मोहिम शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या मोहिमेत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 5 लाख रुपयांचा निधी दान केला.
राम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राम मंदिरासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 5 लाख रुपयांचा चेक सुपूर्द केला. दुसरीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही एक लाख रुपये दिले आहेत.
हे वाचा - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं, कृषी सुधारणेचं पाऊल योग्य; पण...
काही दिवसांपूर्वी राम मंदिर ट्रस्टने सांगितलं होतं की, राम मंदिरासाठी निधी गोळा करत असताना जनतेच्या इच्छेनुसार मंदिराच्या बांधकामासाठी दान घेतलं जाईल. विश्व हिंदू परिषदेची अशी इच्छा आहे की, ही मोहिम देशातील 50 कोटी लोकांपर्यंत पोहचवण्याची आहे. या मोहिमेत गोळा करण्यात आलेल्या पैशांना देवाचे पैसे म्हटले जाती आणि ते मागितले जाणार नाही. भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांमध्ये पैसे जमा होतील.
स्वत:च्या इच्छेनं दान करणाऱ्यांसाठी कूपन छापण्यात येतील. ही कूपन्स 10 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत असतील. 100 रुपयांचे 8 कोटी कूपन्स तर 10 रुपयांचे 4 कोटी कूपन्स छापले जातील. याशिवाय 1000 रुपयांची 12 लाख कूपन्स छापण्यात येतील. दान करण्यात आलेल्या रकमेनुसार पावती देण्यात येईल. सर्व कूपन वाटण्यासाठी 960 कोटी रुपये जमा होऊ शकतील.
हेही वाचा - Farmers Protest : चर्चेची 9 वी फेरी आज; राहुल गांधींच्या नेतृत्वात आज काँग्रेस रस्त्यावर
मंदिरासाठी पैसे गोळा करताना पूर्णपणे पारदर्शक व्यवहार केले जातील असं सांगण्यात आलं आहे. ज्या बँकांमध्ये पैसे जमा होतील ते फक्त कलेक्शन अकाउंटचं काम करतील. जवळपास 46 हजार शाखांच्या माध्यमातून देशभरात पैसे जमा होतील. तीन लोकांची एक टीम पैसे गोळा केल्यानंतर ते जवळच्या शाखेत 48 तासांच्या आत बँकेत जमा करतील.