धक्कादायक! पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती,सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते, राज्यांचे मुख्यमंत्री ...यांच्यावर चीनची नजर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

भारत-चीन वाद आता चांगलाच विकोपाला जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. काही दिवसांपुर्वीच भारताने चीनवर डिजीटल स्ट्राईक केला होता. आता चीनकडूनही यास प्रत्यूत्तर दिलं गेलं आहे. एक नवीन खुलासा उघडकीस आला आहे चीन सध्या भारतातील 10 हजारहून अधिक सेलिब्रेटी, नेते आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींवर हेरगिरी (China Spying Indian Leaders) करत असल्याचं उघड झालं आहे.

नवी दिल्ली - भारत-चीन वाद आता चांगलाच विकोपाला जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. काही दिवसांपुर्वीच भारताने चीनवर डिजीटल स्ट्राईक केला होता. आता चीनकडूनही यास प्रत्यूत्तर दिलं गेलं आहे. एक नवीन खुलासा उघडकीस आला आहे चीन सध्या भारतातील 10 हजारहून अधिक सेलिब्रेटी, नेते आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींवर हेरगिरी (China Spying Indian Leaders) करत असल्याचं उघड झालं आहे. चीनच्या शेनजेन प्रांतातील एक तंत्रज्ञान कंपनी चीनची कृत्य करत तडीस नेत आहे. चीन करत असलेल्या भारतीय व्यक्तींच्या हेरगिरी यादीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक नेते, अभिनेते आणि खेळाडूंचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशाचे पंतप्रधान ते मुख्यमंत्र्यांपर्यंत चीनची नजर!
 'इंडियन एक्स्प्रेस' च्या वृत्तानुसार, जेनहुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कंपनी (Zhenhua Data Information Technology Co. ) चा चीन सरकार आणि तेथील कम्युनिस्ट पक्षाशी जवळचा संबंध आहे.  चीन त्याला 'हायब्रिड वॉरफेअर' असं नाव देत आहे. ही कंपनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबीय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ओडिशाचे सीएम नवीन पटनायक, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासारख्या व्यक्तींवर नजर ठेवून आहे.

व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेच्या पुरस्कारावर मराठमोळ्या 'चैतन्य'ने कोरले आपले नाव

एवढेच नाही तर  जेनहुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कंपनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारमण, स्मृती इराणी आणि पियुष गोयल यांच्यावर ही चिनी कंपनी लक्ष ठेवून आहे. 

कंगनाने मुंबई सोडली; जाता जाता पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

जेनहुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कंपनीची लष्करप्रमुख बिपिन रावत आणि सैन्य, नौदल आणि हवाई दलाच्या किमान 15 माजी प्रमुखांवरही नजर ठेवून आहे. तसेच भारताचे  सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश शरद बोबडे  (CJI SA Bobde)आणि न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर ते लोकपाल न्यायमूर्ती पी.सी. घोष आणि कॅग जी.सी. मुर्मू यांच्यावरही यातून सुटले नाहीत. 'भारत पे' चे संस्थापक निपुण मेहरा, उद्योगपती रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्यासारखे अनेक उद्योगपतींवरही चीनची नजर आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Ramnath Kovind PM Modi Opposition Leader CM Chief Justice China