esakal | हिमाचाल दौऱ्यात राष्ट्रपती निवासाऐवजी राष्ट्रपतींचा मुक्काम खासगी हॉटेलमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

ramnath kovind

चार दिवसांच्या दौऱ्यावर येण्याआधी हिमाचल प्रदेशमधील रिट्रिट या राष्ट्रपती निवासस्थानातील चार कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हिमाचाल दौऱ्यात राष्ट्रपतींचा मुक्काम खासगी हॉटेलमध्ये

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सिमला : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हिमाचल प्रदेशमध्ये खासगी हॉटेलमध्ये वास्तव्य करावं लागणार आहे. चार दिवसांच्या दौऱ्यावर येण्याआधी हिमाचल प्रदेशमधील रिट्रिट या राष्ट्रपती निवासस्थानातील चार कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना राष्ट्रपती निवासाऐवजी शिमल्यातील एका खासगी हॉटेलमध्ये उतरावं लागणार आहे.

चार दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती हे हिमाचल प्रदेशाच्या विधानसभेच्या विशेष सत्रात सदस्यांना संबोधित करणार आहेत. येथे इतरही अनेक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती रामनात कोविंद हे शिमलामधील छराबडा इथल्या राष्ट्रपती निवासस्थानी राहणार होते. तिथल्या चार कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी शनिवारी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर राष्ट्रपती सेसिल हॉटेलमध्ये राहणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

राज्याच्या विधानसभेला संबोधित करणारे कोविंद हे तिसरे राष्ट्रपती ठरणार आहेत. याआधी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांनी राज्याच्या विधानसभेला संबोधित केलं होतं. विद्यमान आमदारांशिवाय माजी मुख्यमंत्री शांता कुमार आणि प्रेम कुमार धुमल यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि सर्व माजी आमदारांना विशेष अधिवेशनासाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहिती हिमाचल प्रदेशमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा: सलग चौथ्या दिवशी दिलासा; देशात सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गुरुवारपासून हिमाचल प्रदेशच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राष्ट्रपतींच्या निवासस्थानाऐवजी एका खासगी हॉटेलमध्ये वास्तव्य करणार आहेत. राष्ट्रपती हिमाचल प्रदेशच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती शुक्रवारी सकाळी ११ ते १२ या कालावधीत विधानसभेला संबोधित करणार आहेत. त्यादिवशी सांयकाळी एखा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील. १८ सप्टेंबरला ते शिमल्यात भारतीय लेखा परीक्षेच्या निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर १९ सप्टेंबरला ते दिल्लीला रवाना होतील.

loading image
go to top