राष्ट्रपतींनी वाहिली डॉ. आंबेडकरांना आदरांजली

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

महू (मध्य प्रदेश) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महू येथील डॉ. आंबेडकर यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. महू येथील कालीपलट भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी जाऊन राष्ट्रपतींनी आदरांजली वाहिली. मध्य प्रदेश सरकारने येथे मोठे स्मारक उभारले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जन्मस्थळास भेट देणारे रामनाथ कोविंद हे पहिले राष्ट्रपती आहेत. डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येथे आज दाखल झाले होते.

महू (मध्य प्रदेश) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महू येथील डॉ. आंबेडकर यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. महू येथील कालीपलट भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी जाऊन राष्ट्रपतींनी आदरांजली वाहिली. मध्य प्रदेश सरकारने येथे मोठे स्मारक उभारले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जन्मस्थळास भेट देणारे रामनाथ कोविंद हे पहिले राष्ट्रपती आहेत. डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येथे आज दाखल झाले होते. दरम्यान, राष्ट्रपती कोविंद यांचे इंदोरला आगमन झाल्यानंतर मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: President respect for dr babasaheb ambedkar