
डिजिटल माध्यमातून शनिवारी 16 व्या प्रवासी भारतीय दिनी झालेल्या संम्मेलनात चंद्रिकाप्रसाद संतोखी हेच प्रमुख पाहुणे होते.
नवी दिल्ली : दक्षिण अमेरिकेतील सुरीनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी उर्फ चन संतोखी हे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत राहु शकतात. भारतीय वंशाचे संतोखी राजपथवरील परेडमध्ये सहभागी होणार असल्याच्या वृत्ताला पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पुष्टी दिल्याची चर्चा प्रसारमाध्यमांत रंगत आहे.
नुकतेच 16 व्या भारतीय प्रवास दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या व्हर्चुअल संम्मेलनात चंद्रिकाप्रसाद संतोखी यांना आंमत्रित करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार होते. मात्र ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर त्यांनी भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर भारत सरकारने प्रमुख अतिथीचा शोध सुरु केला होता.
हेही वाचा- देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात; भाजपचा सरकारवर हल्लाबोल
सुरीनामचे राष्ट्रध्याक्षांनी भोजपूरीत साधला होता संवाद
डिजिटल माध्यमातून शनिवारी 16 व्या प्रवासी भारतीय दिनी झालेल्या संम्मेलनात चंद्रिकाप्रसाद संतोखी हेच प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षयीन भाषण करताना त्यांनी भोजपुरीत संवाद साधला होता. ते म्हणाले होते की, 'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, मेरे प्यारे प्यारे भारतीय प्रवासी बंधू बघीनींनो आमचा देश सुरीनाम आपल्या सर्वांच अभिनंदन करतो, असे ते भाजपूरीमध्ये म्हटले होते.