President of Telugu Desam : चंद्राबाबू नायडू यांना चार आठवड्यांसाठी जामीन

चंद्राबाबू नायडू यांना आरोग्याच्या कारणांवरून जामीन दिला आहे. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी
naidu
naidu sakal

अमरावती - कौशल्य विकास गैरव्यवहारप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देसमचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांना चार आठवड्याचा हंगामी जामीन मंजूर झाल्याची माहिती उच्च न्यायालयातील वकील सुनकारा कृष्णमूर्ति यांनी दिली. तेलगू देसमच्या अध्यक्षांना काही अटींसह २४ नोव्हेंबरपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे.

चंद्राबाबू नायडू यांना आरोग्याच्या कारणांवरून जामीन दिला आहे. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालय येत्या १० नोव्हेंबरला नायडू यांच्या मुख्य जामीन याचिकेवर युक्तिवाद ऐकणार आहे.

वैद्यकीय तपासणीशिवाय चंद्राबाबू नायडू यांना अन्य कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेता येणार नाही. तसेच नायडू यांना माध्यम आणि राजकीय कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही, असे बजावले आहे. कोट्यावधी रुपयांच्या कौशल्य विकास गैरव्यवहारप्रकरणी सीआयडीने चंद्राबाबू नायडू यांना नऊ सप्टेंबर रोजी अटक केली होती. कौशल्य विकास कार्यक्रमामुळे राज्याला ३०० कोटींचा फटका बसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाव्यतिरिक्त नायडू यांचे नाव ‘फायबरनेट’ गैरव्यवहार प्रकरण आणि ‘इनररिंग’ गैरव्यवहार प्रकरणात देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com