तमीळ नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

पीटीआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - कावेरी व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती करत तमिळनाडूमधील विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. ही समिती स्थापन करण्यास कर्नाटक राज्याचा विरोध आहे. या भेटीनंतर तमिळनाडूच्या या नेत्यांनी कर्नाटक सरकारच्या आडमुठेपणावर टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही कर्नाटक सरकार कावेरी नदीचे पाणी सोडण्यात टाळाटाळ करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. या शिष्टमंडळामध्ये भाकप नेते खासदार डी. राजा आणि एमडीएमके नेते वैको यांचाही समावेश होता.

Web Title: President to visit the Tamil leaders