राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हांनी दाखल केला अर्ज

Yashwant Sinha Nomination
Yashwant Sinha Nominationesakal
Summary

विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी संसद भवनात पोहोचल्यानंतर अर्ज दाखल केला.

Yashwant Sinha Nomination : राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी संसद भवनात पोहोचल्यानंतर अर्ज दाखल केला. सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, सपा प्रमुख अखिलेश यादव, द्रमुकचे ए राजा आणि एनसी नेते फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी पक्षनेते उपस्थित होते. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या आठवड्यातच उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

माझा मुलगा राजधर्म पाळेल अन् मी माझा राष्ट्रधर्म पाळेन : यशवंत सिन्हा

याआधी रविवारी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा म्हणाले होते, पुढील महिन्यात होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही वैयक्तिक लढतीपेक्षा खूप महत्वाची आहे. सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तींचा प्रतिकार करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे. माझा मुलगा आणि भाजप खासदार जयंत सिन्हाचा मला पाठिंबा न मिळाल्यामुळं मी कोणत्याही धर्म संकटात नाहीय. माझा मुलगा त्याचा राजधर्म पाळेल आणि मी माझा राष्ट्रधर्म पाळेन.

Yashwant Sinha Nomination
गुलाबरावांच्या निष्ठेबाबत सहा महिन्यापूर्वीच शंका; पारकरांचा धक्कादायक खुलासा

18 जुलैला निवडणूक, तर 21 जुलैला मतमोजणी

पुढील राष्ट्रपती निवडण्यासाठी 18 जुलै रोजी निवडणूक होणार असून मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीत खासदार आणि आमदारांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजमधील (Electoral College) 4,809 सदस्य विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा उत्तराधिकारी निवडतील. लोकसभा आणि राज्यसभेत, तसेच अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ पाहता आगामी निवडणुकीत पक्ष आपल्या उमेदवाराचा विजय सहज सुनिश्चित करण्याच्या स्थितीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com