Presidential Election 2022 I पुढचे राष्ट्रपती कोण?, भाजपने ममतांसह काँग्रेस, सपाशी साधला संपर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

presidential election 2022

उमेदवाराबाबत सर्वसामान्यांचे मत तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

पुढचे राष्ट्रपती कोण?, भाजपने ममतांसह काँग्रेस, सपाशी साधला संपर्क

सध्या देशात राष्ट्रपती निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच चर्चांनी उधाण घेतलं आहे. देशातील पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता एक वेगळी राजकीय बातमी समोर येत आहे. (presidential election 2022)

देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी या मुद्द्यावर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीला आणखी रंग चढणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: देशातील पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याबाबत केंद्राचे स्पष्टीकरण

भाजपाचे इतर राज्यकर्त्यांसोबत बोलणे सुरु असून निवडणुकीसाठी उमेदवारांची मने वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजून कोणत्याही उमेदवाराच्या नावावर ठोस निर्णय झालेला नाही. उमेदवाराबाबत सर्वसामान्यांचे मत तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. सुरुवातीच्या चर्चेनंतर एनडीएची बैठक होऊन मग उमेदवाराच्या नावावर चर्चा होणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. या चर्चेनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होऊन शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीला जाण्यापूर्वी एनडीएच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी एनडीएचे घटक पक्ष जेडीयू नेते नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केली आहे. ही निवडणूक 18 जुलै रोजी असून 21 जुलै रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ जून आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही आज देशातील अनेक विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींसोबत विरोधी पक्षाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीला काँग्रेससह डावे, शिवसेनेसह अनेक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा: पुढील 5 दिवसांत सरी बरसणार; 'या' राज्यांत गडगडाटासह वादळी पाऊस

Web Title: Presidential Election 2022 Rajnath Singh Talk To Mamata Banerjee Mallikarjun Kharge Akhilesh Yaedav

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top