New President of india : द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती!

presidential election 2022 result nda presidential candidate droupadi murmu wins
presidential election 2022 result nda presidential candidate droupadi murmu wins

नवी दिल्ली : राष्ट्रपती पदासाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली यामध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा दणदणीत विजय झाला आहे. मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. (presidential election 2022 result nda presidential candidate droupadi murmu wins)

द्रौपदी मुर्मू या या मतमोजणीत आघडीवर होत्या, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. भाजपकडून त्यांच्या विजयाचा जल्लेष साजरा करण्यात येत होता. आमदारांत्या मतदानानंतर दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीनंतर ३२१९ मते मोजण्यात आली होती, ज्या मतांचे मुल्यम ८ लाख ३८,८३९ त्यापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ५ लाख ७७ हजार ७७७ मुल्यांची २१६१ मते खासदार आणि आमदारांची मते मुर्मू यांना मिळाली आहेत.

presidential election 2022 result nda presidential candidate droupadi murmu wins
राष्ट्रवादीला मोठा धक्का! ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त

तर युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना १०५८ इतकी मते आमदार आणि खासदारांनी दिली आहेत ज्यांचं मुल्य २ लाख ६१ हजार ६२ होतं. तीसरी आणि शेवटच्या फेरीतील मते मोजण्यात आल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल. एकूण मतांचे मुल्य दहा लाखापेक्षा जास्त आहे, त्यामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवणारा उमेदवार या निवडणूकीत विजयी होतो. महत्वाचे म्हणजे मुर्मू यांना तेवढी मते मिळाली आहेत.

presidential election 2022 result nda presidential candidate droupadi murmu wins
Aarey Car Shed : बंदी उठवताच, पर्यावरणवादी आक्रमक; फडणवीस म्हणतात...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com