esakal | ‘प्रतिबंधक लस हाच अर्थव्यवस्थेसाठी बूस्टर’; सीतारामन
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala Sitharaman

‘प्रतिबंधक लस हाच अर्थव्यवस्थेसाठी बूस्टर’; सीतारामन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

तुतिकोरीन - अर्थव्यवस्थेला (Economy) चालना देण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस (Covid Preventive Vaccine) हाच उतारा आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन (Nirmal Sitharaman) यांनी म्हटले आहे.

तमिळनाडू मर्कंटाईल बँकेच्या शतक महोत्सवी समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांनी सांगितले की, लशीमुळे उद्योगपती नियमित व्यवसाय करू शकत आहेत. व्यापाऱ्यांना माल मिळतो आहे. शेतकरी शेतीची कामे पार पाडत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे.

देशात आतापर्यंत ७३ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरु आहे, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: 'अब्बा जान' म्हणणाऱ्यांनाच पूर्वी रेशन मिळायचं - CM योगी

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अर्थ मंत्रालयाने सुरु केलेल्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, आपली सारी प्रार्थना तिसरी लाट येऊ नये म्हणूनच आहे, पण ती आली तर रुग्णालये आहेत का याचा विचार करावा लागेल.

रुग्णालये असतील तर तेथे अतिदक्षता विभाग आहे का, तो असल्यास ऑक्सिजन आहे का हे प्रश्न असतात. दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम होत असताना अशा साऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आमच्या मंत्रालयाने सुरु केलेल्या योजनांमुळे रुग्णालये सुसज्ज होत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णालयांनाही विस्तारीकरण करणे शक्य झाले.

loading image
go to top