esakal | पंतप्रधानांना आणखी मजबूत सुरक्षा; अमेरिका पाठवतंय दुसरं VVIP विमान
sakal

बोलून बातमी शोधा

boeing777

भारतचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या विमान प्रवासासाठी तयार करण्यात आलेले बोईंग 777 एअरक्राफ्टचे दुसरे स्पेशल विमान आज अमेरिकेतून भारतात येत आहे

पंतप्रधानांना आणखी मजबूत सुरक्षा; अमेरिका पाठवतंय दुसरं VVIP विमान

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- राष्ट्रपती, पंतप्रधान यांना देश-विदेशचा दौरा करण्यासाठी अधिक मजबूत सुरक्षा मिळणार आहे. भारतचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या विमान प्रवासासाठी तयार करण्यात आलेले बोईंग 777 एअरक्राफ्टचे दुसरे स्पेशल विमान आज अमेरिकेतून भारतात येत आहे. हे व्हीव्हीआयपी विमान आज अमेरिकेतून निघाले आहे आणि काही वेळात भारतात दाखल होणार आहे. ऑक्टोबरमध्ये पहिले बोईंग 777 विमान भारतात आले होते. या विमानांसाठी भारताने 2018 मध्ये बोईंग कंपनीसोबत करार केला होता. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बदल केले आहेत. भारताला मिळणाऱ्या या विमानाचे नाव Air India One ठेवण्यात आले आहे. 

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या विमान प्रवासासाठी बनवण्यात आलेले पहिले बी 777 विमान 1 ऑक्टोंबरला अमेरिकेतून भारतात आले होते. विमान जूलै महिन्यातच भारताला मिळणार होते, पण याला वेळ लागला. सुरुवातीला कोरोना महामारीमुळे याला उशिर झाला, तर दुसऱ्यावेळेस काही तांत्रिक कारणामुळे काही आठवडे उशीर झाला. 2018 साली हे दोन्ही विमाने भारताच्या एअर इंडियाचे भाग होते. त्यानंतर त्यांना व्हीव्हीआयपी प्रवासासाठी विषेश रुपात पुनर्निमित करण्यासाठी अमेरिकेच्या डलास येथे पाठवण्यात आले होते. 

चीनला वेसण घालण्यासाठी भारतासारखा सहकारी आवश्यक- अमेरिका

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विमानांची खरेदी आणि पुनर्निमाणासाठी एकूण 8,400 कोटी रुपये खर्च आला आहे. बी777 विमानात अत्याधुनिक मिसाईल रोखू शकणारी प्रणाली आहे. व्हीव्हीआयपी यात्रेदरम्यान, दोन्ही विमानांना एअर इंडियाचे पायलट नाही, तर भारतीय वायूसेनेचे पायलट उडवतील. सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री बी747 विमानांनी प्रवास करतात. 

बोईंग 777मध्ये काय आहे विशेष?

बोईंग 777मध्ये अत्याधुनिक मिसाईल रक्षा प्रणाली आहे. ज्याला लार्ज एयरक्राफ्ट इंफ्रारेड काउंटरमेजर्स (एलएआईआरसीएम) आणि सेल्फ प्रोटेक्शन सूट्स (एसपीएस) म्हटलं जातं. फेब्रुवारीमध्ये अमेरिकेने दोन सुरक्षा प्रणाली 19 कोटी डॉलरमध्ये विकण्याची सहमती दर्शवली होती. दोन्ही विमानांमध्ये असे उपकरणे आहेत, जे कोणत्याही मोठ्या हल्ल्याला रोखू शकतात. या विमानावर मिसाईल हल्ल्याचाही परिणाम होणार नाही आणि विमान हल्ला करण्यासाठी सक्षम आहे. 


 

loading image