पंतप्रधान मोदींनी बुधवारी बोलावली मुख्यमंत्र्यांची बैठक; होऊ शकते महत्त्वाचे निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prime Minister Modi called a meeting of Chief Ministers on Wednesday

मोदींनी बुधवारी बोलावली मुख्यमंत्र्यांची बैठक; कोरोनावर होऊ शकते महत्त्वाचे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narednra Modi) देशातील वाढत्या कोरोना रुग्णांबाबत गंभीर आहेत. त्यांनी बुधवारी (ता. २७) दुपारी १२ वाजता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी बोलून परिस्थितीची माहिती घेतील. बैठकीनंतर कोरोना रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. (Prime Minister Modi called a meeting of Chief Ministers on Wednesday)

मंगळवारी देशभरात कोरोनाचे २,४८३ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे देशात आतापर्यंत ४,३०,६२,५६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राजधानी दिल्लीबद्दल (delhi) बोलायचे तर येथे सकारात्मकता दर सहा टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे मृतांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांवर हल्ला; म्हणाले, राज्यपाल हे केवळ पोस्टमनसारखे

देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) धोका वाढत चालला आहे. देशात कोरोनाच्या (coronvirus) वाढत्या रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) २७ एप्रिल रोजी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. यात कोरोना नियमांबाबत कठोर निर्णय होण्याची शक्यता आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून होईल.

Web Title: Prime Minister Modi Called A Meeting Of Chief Ministers On Wednesday Coronvirus Covid Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top