Central Ministers : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी आपण यापुढे प्रयत्न करू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बहुतेक केंद्रीय मंत्र्यांनी आज आपआपल्या मंत्रालयाच्या कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला.
amit shah
amit shahsakal

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बहुतेक केंद्रीय मंत्र्यांनी आज आपआपल्या मंत्रालयाच्या कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे व रामदास आठवले यांनी ही कार्यभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी आपण यापुढे प्रयत्न करू, असे मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त केले. केंद्रीय भूपृष्ठ व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र आज पदभार स्वीकारला नाही.

काल रात्री खातेवाटप जाहीर झाल्यानंतर सकाळपासून मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारण्यात सुरवात केली. केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकाळी ९ वाजता पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी रेल्वे या खात्याचा पुन्हा पदभार स्वीकारला. गृहमंत्री अमित शहा यांनी नॉर्थ ब्लॉकमध्ये गृहमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यादरम्यान त्यांनी राष्ट्रीय पोलिस स्मारकास अभिवादन केले.

देशातील अंतर्गत सुरक्षा पुन्हा मजबूत करण्यासाठी तसेच नक्षलवाद, दहशतवाद व घुसखोरीच्या विरोधात कडक धोरणे राबविण्यात येईल, त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनीही कार्यभार स्वीकारला. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी पदभार स्वीकारला.

युवकांसाठी प्रयत्न करू : रक्षा खडसे

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्या म्हणाल्या, युवकांना क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाईल. देशातील नामांकित क्रीडापटूंशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याचा संकल्प राहील.

शंभर दिवसांचा संकल्प पूर्ण करू : आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० दिवसांचा कार्यसंकल्प केला आहे. या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न एक महत्वाचा विषय असल्याचे सांगून ते म्हणाले, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत व नियमित मिळावी, यासाठी पुढे निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अवयवदानाचा संकल्प : प्रतापराव जाधव

केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी अवयवदानाचा संकल्प करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आयुष हे नवे खाते केंद्र सरकारने निर्माण केले आहे. खात्याचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com