Mera Booth Sabse Mazboot : काहीही झालं, तरीही भारताची प्रगती थांबणार नाही - पंतप्रधान मोदी

Prime Minister Narendra Modi interacts by video conference with bjp party workers
Prime Minister Narendra Modi interacts by video conference with bjp party workers

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
व्हिडीओ कॉर्न्फन्स् द्वारे मोदींनी 1 करोड कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बुथ कार्यकर्त्यांनी येत्या निवडणूकीच्या अनुषंगाने काय खबरदारी घ्यायला पाहिजे याविषयी मोदींनी बूथ कार्यकर्त्यांना काही पर्याय सूचविले. 

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बूथ कार्यकर्त्यांना सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे : 

  • भारत के मन की बात भारतीय रहिवासी माझ्यापर्यंत सरळ सरळ पोहोचवू शकतो.
  • भाजप मध्ये सामिल होण्यासाठी लोकांशी बोला. आपल्या घरांवर, वाहनांवर भाजप चा झेंडा लावा. युवांनी मोठ्या उत्साहात या चळवळीत सामिल व्हावे.
  • सत्ता आणि विरोधी पक्षात नितळ स्पर्धा व्हायला पाहिजे. असे झाले तरच लोकतंत्र मजबूत होतो.
  • बुथ कार्यकर्त्यांची यापुढे ही जबाबदारी राहील की, प्रत्येकाने कमीत कमी 10 कुटुंबासोबत अगदी जवळचे संबंध बनवावे. या कुटुंबांना भाजपमध्ये सामिल करुन घेण्यास पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने समजवावी.
  • नमो अॅप डाउनलोड करा आणि डोनेशन, सूचना द्या. नमो अॅप शेअर करा.
  • आमच्यावरचा तुमचा विश्वास हीच आमची ताकद आहे.


याशिवाय, पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रत्येक अशक्य गोष्ट आता शक्य आहे. भारताची प्रगती रोखणे हे दहशतवाद्याेच लक्ष्यं आहे. असे असले तरी भारताला अस्थिर करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. काहीही झालं, तरीही भारताची प्रगती थांबणार नाही. व्यापक स्तरावर आम्ही संवाद करत आहोत. आपणही प्रत्येकाने आपल्या परिने योगदान द्यावे. पूर्ण ताकद पणाला लावून सैन्याच्या पाठीशी आपण उभे राहू. संपूर्ण जगाचं लक्षं आपल्याकडे लागलं आहे. म्हणूनच आता आमच्या परिक्षेची वेळ आली आहे. तसेच, मोदींनी विरोधकांनाही टोला लगावला. ते म्हणाले, 'काहींना मजबूत सरकार नाही तर मजबूर सरकार पाहिजे आहे. जेणेकरुन ते आपला स्वार्थ साध्य करतील, पण भाजप एक मजबूत सरकार आहे.'





 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com