सुषमांचे पार्थिव पाहून मोदींचे डोळे पाणावले

वृत्तसंस्था
Wednesday, 7 August 2019

मोदींनी त्यांची कन्या बान्सूरी व पती स्वराज कौशल यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी त्यांचे सांत्वन केले. तसेच बान्सूरीच्या डोक्यावर हात ठेवून तिला धीर दिला. यावेळी मोदींचे डोळे पाणावले होते. मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतले. 

नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी निधन झाल्यानंतर आज (बुधवार) त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवले असून, त्यांच्या अंत्यदर्शनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले. 

मोदींनी त्यांची कन्या बान्सूरी व पती स्वराज कौशल यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी त्यांचे सांत्वन केले. तसेच बान्सूरीच्या डोक्यावर हात ठेवून तिला धीर दिला. यावेळी मोदींचे डोळे पाणावले होते. मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतले. 

स्वराज यांच्या निधनानंतर देशभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्वराज यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीनच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुपारी 12 ते 3 या वेळेत भाजप मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर लोधी रस्त्यावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi pays last respects to former External Affairs Minister Sushma Swaraj