Ayodhya News : पंतप्रधान मोदींच्या रोड- शो, जाहीर सभेसाठी अयोध्येत जय्यत तयारी

अयोध्येतील अवघे वातावरण राममय होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी (ता.30) रोड शो होणार आहे.
Narendra Modi
Narendra ModiSakal

अयोध्या - अयोध्येतील अवघे वातावरण राममय होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी (ता.30) रोड शो होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आणि संघ परिवारातील संस्थांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ आणि आयोध्या धाम रेल्वे जंक्शनच्या उद्घाटनासाठी मोदी शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास अयोध्येत येत आहेत. अयोध्या - दिल्ली या विमान मार्गाला आणि वंदे भारतच्या अयोध्या - दिल्ली, अमृत भारतची अयोध्या - दरभंगा या मार्गावरील रेल्वे गाड्यांना पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवतील.

त्यानंतर धर्म पथ आणि राम पथावर 15 किलोमीटरचा त्यांचा रोड शो होईल. त्यानंतर विमानतळा जवळील मैदानावर मोदींची जाहीर सभा होणार आहे. या सभेला 3 लाखांचा जनसमुदाय गोळा करण्यासाठी भाजप आणि संघ परिवारातील संघटनांचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती प्रदेश भाजपचे संघटन महामंत्री धर्मपाल सिंह यांनी दिली.

रोड- शो साठी रस्त्यावर लाकडी बॅरिकेडीग करण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून शुक्रवारी (ता. 29) त्याची रंगीत तालीम होणार आहे. रोड शो दरम्यान नागरिकांना मोदी यांचे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्वागत करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीचे नियोजन भाजपकडून जोरात सुरू आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे.

प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी साडेचार हजार साधूंना आमंत्रण

भव्य श्री राम मंदिरात श्रीरामाची प्रतिष्ठापना करण्याच्या सोहळ्यात देशातील 4 हजार 500 साधूसंतांना आमंत्रित करण्यात आले आहे. उद्योग, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, चित्रपट, साहित्य, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतील 2 हजार प्रमुख व्यक्तींना आमंत्रण देण्यात येत आहे.

कार्यक्रम स्थळी उपस्थित संख्येवर मर्यादा असल्यामुळे राज्यांचे खासदार विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार यांना आमंत्रित कसे करायचे, याबाबतचे नियोजन सुरू आहे. तूर्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबाई पटेल यांची उपस्थिती निश्चित असल्याचे श्री राम जन्मभूमी न्यासातील सूत्रांनी स्पष्ट केले.

प्रत्येक आमदाराने 5 हजार भाविकांना आयोजित घेऊन जावे - बावनकुळे

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर प्रत्येक आमदाराने श्रीरामाच्या दर्शनासाठी किमान 5 हजार नागरिकांना अयोध्येत घेऊन जावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील आमदारांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com