बोरीस जॉनसन यांचा भारत दौरा पुन्हा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

बोरीस जॉनसन यांचा भारत दौरा पुन्हा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णसंख्येने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर भयंकर असा ताण निर्माण झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या कोरोनाच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे कमी अधिक नियम लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवरच आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांचा पुढील आठवड्यात होणारा भारत दौरा रद्द करण्यात आला आहे. भारत सरकारने याची माहिती दिली आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एक वक्तव्य जाहीर करत म्हटलंय की कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय की, आता दोन्हीही पंतप्रधान व्हर्च्यूअल मीटिंगच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतील. याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांना 26 जानेवारी रोजी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, तो दौरा देखील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता.

बोरीस जॉनसन यांचा भारत दौरा पुन्हा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांच्यासारखा विचार करत नाहीत - केंद्रीय मंत्री

बोरीस जॉनसन यांच्या या दौऱ्याबाबत मिडीयामधून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर उत्तर म्हणून परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहीर केलेल्या वक्तव्यात म्हटलंय की, दोन्ही देशांच्या दरम्यान चर्चा केल्यानंतर हा दौरा रद्द केला गेलाय. कोविडची परिस्थिती पाहता दोन्ही देशांमधील परस्पर सहमतीनुसार हा निर्णय घेतला गेला आहे. युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरीस जॉनसन पुढच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार नाहीयेत. दोन्हीही देश येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक व्हर्च्यूअल मिटींग करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com