पंतप्रधानांच्या भेटवस्तूंना लिलावात लाखोंची बोली

पीटीआय
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

ई-लिलावातूनही अनेक साहित्यांना चांगली बोली लावली गेली. भगवान शिव यांच्या एका मूर्तीचे किमान मूल्य 5 हजार रुपये असताना त्याचा 10 लाखांत लिलाव झाला. ही किंमत वास्तव किमतीच्या 200 पट अधिक आहे. लाकडी अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीची किमान किंमत 4 हजार असताना लिलावात या प्रतिकृतीला 13 लाख रुपये मिळाले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दौऱ्यादरम्यान देश-विदेशातून भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या लिलावात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (एनजीएमए) तर्फे दिल्लीत आयोजित लिलावातून मिळालेल्या निधीचा उपयोग नमामि गंगे प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. 

27 जानेवारीपासून सुरू झालेली लिलावाची प्रक्रिया शनिवारी सायंकाळी संपली. नागरिकांकडून लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश-विदेशातील दौऱ्यात मिळालेला सुमारे 2 हजार भेटवस्तूंचा लिलाव 27 ते 28 जानेवारीला झाला. या वस्तूंचा ऑनलाइन लिलाव 29 ते 31 जानेवारीपर्यंत सुरू होता. यादरम्यान स्मृतिचिन्हाला चांगली बोली लावण्यात आली होती. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या वतीने आयाजित लिलावात विशेषत: हाताने तयार केलेल्या लाकडी बाइकला पाच लाखांची बोली लावण्यात आली होती. याशिवाय एका प्लॅटफॉर्मवर दिसणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या पेटिंगला चांगली बोली लावण्यात आली. या पेटिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रेल्वेशी असलेला आपलेपणा दिसतो.

ई-लिलावातूनही अनेक साहित्यांना चांगली बोली लावली गेली. भगवान शिव यांच्या एका मूर्तीचे किमान मूल्य 5 हजार रुपये असताना त्याचा 10 लाखांत लिलाव झाला. ही किंमत वास्तव किमतीच्या 200 पट अधिक आहे. लाकडी अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीची किमान किंमत 4 हजार असताना लिलावात या प्रतिकृतीला 13 लाख रुपये मिळाले.

गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची किमान किंमत 4 हजार रुपये होती आणि त्याचा लिलाव 7 लाख रुपयांत झाला. दहा हजारांच्या किमतीचे चांदीच्या कलशाला 6 लाख रुपयांची किंमत मिळाली. नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांनी दिलेल्या सिंहाच्या पारंपरिक पितळी मूर्तीचा लिलाव 5.20 लाख रुपयांना झाला. 

Web Title: Prime Ministers Gifts gets Lakhs of Rupees in auction