पुलवामा हल्ल्याबाबत सौदीचे मौनव्रतच

saudi1
saudi1

नवी दिल्ली : भारत व सौदी अरेबियामध्ये आज (ता. 20) महत्त्वपूर्ण पाच करार झाले. सौदीचे राजा मोहम्मद बिन सलमान हे मंगळवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान भारत व सौदीमध्ये दोन्ही देशांना उपयुक्त असे पाच करार झाले. तसेच मोहम्मद बिन सलमान यांनी दहशतवाद संपविण्यासाठी पूर्ण सहकार्य करू असेही सांगितले.

दोन्ही देशांमध्ये झालेले महत्त्वपूर्ण करार
- ऊर्जा करार
- पर्यटन क्षेत्रात एमओयूवर स्वाक्षऱ्या
- द्विपक्षीय व्यापारासंबंधी करार
- प्रसार भारती व सौदी अरबमध्ये प्रसारणसंबंधी करार
- आंतरराष्ट्रीय सौरऊर्जेसंबंधी करार

सलमान हे भारतदौऱ्याच्या आधी पाकिस्तानमध्ये जाऊन आले आहेत. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबाबात सलमान यांनी कोणतेही उद्गार काढले नाही. पण दहशतवाद संपविण्यासाठी आम्ही भारताला संपूर्ण सहकार्य करू असेही सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com