इसिससाठी पैसा गोळा करणाऱ्या दोघांना तुरुंगवास

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

नवी दिल्ली : इसिससाठी पैसा गोळा करणे आणि भरती प्रकरणी दोषी ठरल्याने विशेष न्यायालयाने दोन जणांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमरनाथ यांनी जम्मू काश्‍मीरचा अझर उल इस्लाम (वय 24) आणि महाराष्ट्राचा महंमद फरहान शेख (वय 25) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. आपण केलेल्या कृत्याचा आपल्याला खेद वाटत असल्याचे आरोपींनी आपल्या वकिलामार्फत न्यायालयात सांगितले. आपली पूर्वीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसून आपण पुन्हा मुख्य प्रवाहात येऊ इच्छित आहे. अर्जदाराला कोणत्याही दबावाशिवाय, जबरदस्तीशिवाय दोषी ठरवीत असल्याचे याचिकेत म्हटले होते.

इसिससाठी पैसा गोळा करणे आणि माणसांची भर्ती करणे याबाबतचे आरोप गेल्या महिन्यांत न्यायालयाने या अदनान हसन आणि या दोन्ही आरोपींविरुद्ध निश्‍चित केले होते. मात्र हसन विरोधात स्वतंत्र्यपणे खटला चालू होता. न्यायालयाने या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली कट रचल्याचा आणि बेकायदा कृती प्रतिबंध अधिनियम तरतुदीनुसार आरोप ठेवले होते. गेल्या वर्षी 28 जानेवारीत या तिघांविरुद्ध राष्ट्रीय तपास पथकाने गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांना अबूधाबीवरून आल्यानंतर अटक करण्यात आली होती.

Web Title: Prison for the two who collect money for isis