

Epstein controversy political implications India
esakal
Marathi Leader PM Speculation : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील बहुचर्चित एपस्टीन फाईल्स प्रकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेत या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती जाहीर झाल्यास त्याचे पडसाद भारतातही उमटू शकतात, असे सूचक विधान करत चव्हाण यांनी “यामुळे मराठी माणसाला देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते,” असा दावा केला.