esakal | 'मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांची देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे'

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan
'मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांची देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे'
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : देशातील सध्याच्या ऑक्सिजन कमतरतेच्या संकटासाठी केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार आहे असल्याचा आराेप काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. केंद्र सरकाराच्या आराेग्य मंत्रालयाने ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असे सूचित केले हाेते. त्यानंतर आजही सर्व काही सुरळीत असल्याचे सांगण्यात येत आहे.



आमदार चव्हाण यांनी ट्विटच्या माध्यमातून सध्या देशास अभूतपूर्व ऑक्सिजनच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. रुग्णालय आणि रूग्णांकडून ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रत्येक मिनिटाला कॉल येत आहेत. रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन नकार देत आहेत. ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे अहवाल देशभरातून येत आहेत. दिल्लीतील खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनकडे उच्च न्यायालयात जावे लागले.

लाेकांचा जीव वाचणे महत्वाचे की उद्‌घाटन; निर्णय झाला पाहिजे

केंद्र सरकारने उत्तर द्यावे


मंत्रालयाने असे कसे गृहित धरले की वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबद्दल आपण अत्यंत परिपुर्ण स्थितीत आहोत?

गेल्या पाच महिन्यांत नियोजित 1 लाख मेट्रीक टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्यासाठी त्वरित प्रभावी कारवाई का केली नाही?

आत्तापर्यंत रुग्णालयांमध्ये नियोजित पैकी केवळ 33 पीएसए ऑक्सिजन जनरेटर बसविण्यात आले आहेत हे खरे आहे का?

सातारा : 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाबाबत आरोग्य विभाग संभ्रमात

ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू पावलेल्या कोविड रूग्णांच्या वास्तविकतेस उत्तर हवं आहे. या दुर्घटनेस जबाबदार असलेले आरोग्यमंत्री आणि इतरांना तातडीने काढून टाकण्याची मागणी आहे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.