esakal | सातारा : 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाबाबत आरोग्य विभाग संभ्रमात

बोलून बातमी शोधा

corona vaccination
सातारा : 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाबाबत आरोग्य विभाग संभ्रमात
sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : जिल्ह्यातील 124 कोरोना संवेदनशील लसीकरण केंद्रांची यादी आरोग्य विभागाने तयार केली असून, या केंद्रांवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी आता पोलिस बंदोबस्तात लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत अद्याप आरोग्य यंत्रणेमध्ये संभ्रम असून, या वयोगटाला मोफत लस दिली जाणार, की विकत घ्यावी लागणार, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे एक मेपसून नागरिकांत गोंधळ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरवातीच्या आरोग्य सेवक व फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतरच्या टप्प्यात 60 वर्षांवरील नागरिक व 45 ते 60 च्या दरम्यानच्या पूर्वीचे आजार असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात येत होते. तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाला सुरवात झाली. जिल्ह्यातील नागरिकांची त्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यातच केंद्र शासनाने एक मेपासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे; परंतु या लसीकरणाबाबत आरोग्य विभागाबरोबरच नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

संभ्रमामुळे गोंधळाची शक्‍यता

एक मेपासून मोफत लस मिळणार अशी नागरिकांची धारणा आहे. त्यामुळे शनिवारपासून (ता. 1) लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ शकते. परवानगी मिळालेल्या वयोगाटत तरुण असल्यामुळे केंद्रांवर गोंधळही निर्माण होऊ शकतो. ही शक्‍यता गृहीत धरून कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस व आरोग्य यंत्रणेणे दक्षता घेतली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या एकूण 446 लसीकरण केंद्र कार्यरत आहे. त्या केंद्रावरील स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यातून 145 लसीकरण केंद्र हे संवदेशील म्हणून काढण्यात आली आहेत. या लसीकरण केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची विनंती आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या केंद्रांवर आजपासून (ता. 28) पोलिस बंदोबस्तात लसीकरण होणार आहे.

लस मिळणार कशी...

18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाला आहे. ती विकत मिळणार की मोफत हा संभ्रम आहे; परंतु मोफत किंवा विकत लस द्यायची झाल्यास ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार का, असा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू आहे; परंतु त्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या तुलने लस कमी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक केंद्रावर लसीकरण बंद करावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयातही आज लसीकरण बंद होते. दुसरा डोस घ्यायला असलेल्या नागरिकांनाही दिलेल्या कालावधीत लस उपलब्ध होत नाही. त्यात आणखी संख्या वाढल्यास दुसरी लस तरी नागरिकांना वेळेत मिळणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे वयोगट वाढविण्याच्या निर्णयाबरोबर लस जास्त संख्येने उपलब्ध होईल, याकडेही शासनाने तातडीने लक्ष देणे आवश्‍यक आहे.

एखाद्याला कोरोना झाला, तर त्याची गावभर सेलिब्रेटीपेक्षा जास्त चर्चा व्हायची; पण मी ठरवलं..

रिझर्व्ह बॅंक सहकाराच्या मुळावर उठली आहे. त्यांना सहकारी संस्था मोडीत काढायच्यात.

लसीकरण मोफत की विकत...

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र शासनाने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास परवानगी दिली आहे; परंतु त्यांच्या निर्देशात या नागरिकांनी खासगी रुग्णालयात नोंदणी करून शुल्क भरून लस घ्यायची, असे म्हटले आहे. राज्यांना जर वेगळा निर्णय घ्यायचा असेल, तर त्या मोफत लसीकरणाचा भार त्यांनी सोसायचा आहे. राज्य शासनाने सुरवातीला मोफत लस देण्याची भूमिका घेतली होती; परंतु त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय होऊन अध्यादेश आलेला नाही. त्यामुळे एक तारखेपासून लसीकरण केंद्रावर येणाऱ्यांना लस द्यायची का नाही, असा प्रश्‍न आरोग्य विभागासमोर आहे.

FDA चे अधिकारी म्हणतात "आम्हाला काय एवढीच कामे आहेत का?