Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

Prithviraj Chavan Statement on Operation Sindoor :पृथ्वीराज चव्हाण यांनी असाही आरोप केलाय, की ''ऑपरेशन सिंदूरबद्दलचे संपूर्ण सत्य देशासमोर आलेले नाही. ''
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanEsakal
Updated on

Prithviraj Chavan controversial statement : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत एक विधान केलंय, ज्यामुळे आता नवीन वाद उफाळण्याची चिन्हं आहेत. शिवाय, भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे.

‘’ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताला दारुण पराभवास सामोरे जावे लागले आणि भारतीय हवाई दल पूर्णपणे ठप्प होते.’’ असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्याचं समोर आलंय. तर भारतीय जनता पक्षाने चव्हाण यांच्या विधानावर तीव्र टीका केली आहे. भाजपने म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष भारतीय सशस्त्र दलांचा तिरस्कार करतो आणि सैन्याचे मनोबल खचवण्याचा प्रयत्न करत आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,  ७ मे रोजी झालेल्या सुमारे अर्धा तास चाललेल्या हवाई युद्धात भारतीय बाजूचे मोठे नुकसान झाले, लोक यावर विश्वास ठेवोत किंवा न ठेवोत. एवढच नाहीतर त्यांनी असाही दावा केला की, यादरम्यान भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली आणि हवाई दलाचे एकही विमान उड्डाण करू शकले नाही.

Prithviraj Chavan
IPL 2026 Auction Most Expensive Players : आयपीएल २०२६ च्या लिलावात सर्वात महागडे ठरलेले खेळाडू; पाहा फक्त एका क्लिकवर!

पृथ्वीराज चव्हाण यांनी असा आरोप केलाय, की ऑपरेशन सिंदूरबद्दलचे संपूर्ण सत्य देशासमोर आलेले नाही. त्यांनी म्हटले की, युद्धात नुकसान होणे सामान्य आहे, परंतु सरकार काही तथ्ये लपवत आहे. लष्करी पातळीवर रणनितीक त्रुटी मान्य केल्या जात असताना, सरकार सत्य समोर येण्यापासून रोखत आहे.

Prithviraj Chavan
Gevarai BJP Leader Balraje Pawar Arrest: गेवराईत भाजपच्या बाळराजे पवारांना मध्यरात्री अटक ; नगरपालिका मतदानाच्या दिवशी झाला होता राडा!

याशिवाय पृथ्वीराज चव्हाण यांनी असाही दावा केला की परदेशी मीडिया भारताचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त देत आहे आणि चीनमुळे पाकिस्तानची लष्करी ताकद वाढली आहे. एवढच नाहीतर त्यांनी हे देखील म्हटले की,  कोणतेही भारतीय विमान उड्डाण करताच चीनला त्याबद्दल माहिती मिळते, जी नंतर पाकिस्तानला दिली जाते. तसेच, युद्धबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली युद्धबंदी लागू करण्यात आली होती, जी पंतप्रधान स्वीकारत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com