प्रिया वारियरने सनी लिओनी, कतरिना कैफला टाकले मागे

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

गुगल ट्रेंडमध्ये यावर्षी सर्च केलेल्या नावांमध्ये प्रिया वारियरचे नाव पहिले येते. गेले अनेक वर्षे सेलिब्रिटी सर्च करणाऱ्यांच्या यादीत पॉर्नस्टार सनी लिओनीचे नाव पहिले होते. पण, आता सनीलाही मागे टाकून प्रिया अव्वल ठरली आहे.

नवी दिल्ली - एका गाण्यातून रातोरात स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिने यावर्षीच्या गुगल सर्च ट्रेंडमध्ये अव्वल स्थान पटकावत सनी लिओनी, कतरिना कैफ, आलिया भट्ट यांना मागे टाकले आहे.

गेले दोन दिवस प्रिया वारियरच्या आदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता या व्हिडीओचे असंख्य मिम् तयार होताना दिसत आहेत. गुगलवरही तिच्याच नावाचा बोलबाला असून, गुगल सर्चमध्ये तिच्या नावाने सर्च करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. एवढेच काय तर ट्विटरवरही तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. 'ओरु अदार लव' (Oru Adaar Love) या मल्याळम् चित्रपटातून प्रिया प्रकाश वारियर ही पदार्पण करणार आहे. त्याआधीच ती सर्वत्र लोकप्रिय झाली आहे.  या गाण्यात तिने ज्या प्रकारे तिच्या प्रियकराला डोळा मारला आहे, त्या आदांवर सगळी तरूणाई फिदा झाली आहे.

गुगल ट्रेंडमध्ये यावर्षी सर्च केलेल्या नावांमध्ये प्रिया वारियरचे नाव पहिले येते. गेले अनेक वर्षे सेलिब्रिटी सर्च करणाऱ्यांच्या यादीत पॉर्नस्टार सनी लिओनीचे नाव पहिले होते. पण, आता सनीलाही मागे टाकून प्रिया अव्वल ठरली आहे.

Web Title: Priya Prakash Varrier beats Sunny Leone Alia Bhatt Katrina Kaif on Google search trend 2018