प्रिया राजन ठरल्या चेन्नईच्या सर्वात तरुण अन् पहिल्या दलित महापौर

प्रिया राजन यांना अवघ्या २८ व्या वर्षी महत्त्वाचे पद मिळाले आहे. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
Chennai Mayor Priya Rajan
Chennai Mayor Priya Rajanesakal

चेन्नई : द्रमुकच्या प्रिया राजन यांची अवघ्या २८ व्या वर्षी चेन्नईच्या पहिल्या दलित महापौर म्हणून निवड झाली आहे. त्या सर्वात तरुण महापौर ठरल्या आहेत. तसेच त्या चेन्नईच्या तिसऱ्या महिला महापौर आहेत. ही निवड बिनविरोध झाली आहे. प्रिया राजन (Priya Rajan) यांनी वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. चेन्नई महापालिका (Greater Chennai Corporation) आयुक्त गंगदीपसिंग बेदी यांनी त्यांना महापौरपदाची शपथ दिली. यावेळी द्रमुकचे (DMK) कॅबिनेटमंत्री पी.के.सेकर बाबू आणि मा सुब्रमणियन उपस्थित होते. पालिका निवडणुकांसाठी राज्यात गेल्या शुक्रवारी निवडणुका झाल्या होत्या. शपथविधीचा कार्यक्रम सकाळी पार पडला.

Chennai Mayor Priya Rajan
Russia Ukraine War Live : रशियाने युक्रेनचा अणुऊर्जा प्रकल्प घेतला ताब्यात

तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील पालिकांच्या निवडणुका गेल्या शुक्रवारी झाल्या होत्या. शपथविधीचा कार्यक्रम सकाळी पार पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com