Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Priyank Kharge statement on Hindu religion : जाणून घ्या, असं नेमकं हिंदू धर्माबाबत काय म्हणाले आहेत प्रियांक खर्गे? ; भाजप आता हा मुद्दा उचलून धरणार असल्याचेही दिसत आहे.
Congress leader Priyank Kharge’s controversial statement on Hindu religion in Karnataka sparks political and public debate.

Congress leader Priyank Kharge’s controversial statement on Hindu religion in Karnataka sparks political and public debate.

esakal

Updated on

Priyank Kharge’s Controversial Statement in Karnataka : काँग्रेस नेते निवडणुकांच्या तोंडावर सेल्फगोल करण्यासाठी ओळखले जातात, असं बऱ्याचदा म्हटलं जातं. याला कारणही तसंच आहे, की आतापर्यंतच्या महत्त्वपूर्ण निवडणुकांआधी कोणत्या ना कोणत्या काँग्रेस नेत्याकडून असं काह विधान केलं जातं, की ज्यावरून बऱ्याचदा काँग्रेस पक्षाला मग नुकसान सहन करण्याची वेळ येते. आता या नेत्यांच्या यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पूत्र प्रियांक खर्गे यांचेही नाव समाविष्ट झाल्याचं दिसून येत आहे.

कारण, कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये प्रियांक खर्गे यांनी म्हटले की, शीख, जैन, बौद्ध आणि लिंगायत धर्म सर्व भारतात एक वेगळे धर्म उदयास आले. कारण, हिंदू धर्माने समाजातील काही वर्गांना सन्मानाचे स्थान दिले नाही. भाजप नेत्यांनी हा मुद्दा बनवला आहे आणि काँग्रेसच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. याला बिहार निवडणुकीशीही जोडलं जात आहे, त्यामुळे आता प्रियांक खर्गे यांचे हे विधान बिहार निवडणुकीआधी काँग्रेसने केलेला ‘सेल्फ गोल’ असल्याचंही काहीजण म्हणत आहेत.

खरंतर हे केवळ प्रियांक खर्गेंबद्दलच आहे असं नाही, याआधी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिंदू समाज आणि असमानता व जातीवादावर टिप्पणी केली होती. ज्यावरून हिंदू धर्माला अपमानित केलं गेल्याचा भाजपने आरोप करत, याचा मुद्दा बनवला होता.

Congress leader Priyank Kharge’s controversial statement on Hindu religion in Karnataka sparks political and public debate.
Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

तसेच प्रदेश भाजप अध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र आणि एमएलसी सी.टी.रवी यांनी म्हटले होते की, अशी विधानं करून राज्य सरकार धर्मांतरणास प्रोत्साहन देत आहे. तर यालाच प्रत्युत्तर देताना प्रियांक खर्गे यांनी हिंदू धर्माबाबत अशाप्रकारे विधान केल्याचं दिसून येत आहे. याशिवाय, भाजप नेत्यांवर पलटवार करत प्रियांक खर्गे यांनी असंही म्हटलं की, मला नाही वाटत विजयेंद्र आणि रवी भारतातील धर्मांच्या इतिहासाबाबत जाणतात. शीख धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म आणि लिंगायत धर्म सर्व भारतात वेगळ्या धर्माच्या रूपात उदयास आले. हे सर्व धर्म यामुळे उदयास आले कारण, हिंदू धर्माने यांच्यासाठी स्थान नाही निर्माण केले, यांना सन्मान नाही दिला.

Congress leader Priyank Kharge’s controversial statement on Hindu religion in Karnataka sparks political and public debate.
Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

याचबरोबर मीडियाशी बोलताना त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की, चातुर्वर्ण व्यवस्था काय आहे? ही दुसऱ्या कोणत्या धर्मात आहे का? ही केवळ हिंदू धर्मातच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की, हिंदू म्हणून जन्माला येणे माझ्या हातात नव्हते, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. का? कारण वर्ण व्यवस्थेमुळे. त्यांनी म्हटले, लोकांना प्रतिष्ठा नव्हती, विविध जातींना या व्यवस्थेच्या बाहेर गेल्याचे वाटले. भारतात जेवढे धर्म उदयास आले, ते याच असमानतेविरोधात उदयास आले. मला नाही वाटत की हे भाजप नेते जाणतात की ते खरोखरच काय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com