काँग्रेसला झटका; प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा

Priyanka Chaturvedi quits congress party
Priyanka Chaturvedi quits congress party

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आज पदाचा राजीनामा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिले जाते, असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल त्यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडललादेखील टॅग केलं होतं. यामुळे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली होती. 

 



काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. चतुर्वेदी या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com