"...तेव्हा BJP सरकारने बसेस दिल्या नाही"; प्रियंका गांधींनी साधला निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Gandhi

"...तेव्हा BJP सरकारने बसेस दिल्या नाही"; प्रियंका गांधींनी साधला निशाणा

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या गेल्या काही दिवसांपासून भाजप केंद्र सरकारविरोधात दंड थोपटून मैदानात उतरलेल्या पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय हालचाली वाढत असून, सर्वच पक्षांनी तयारी सूरू केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आपले दौरे वाढवलेले आहेत. या दौऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात लोकं यावी यासाठी भाजपकडून बसेस लावल्या जाता आहेत. यावरूनच आता प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा: कॅगच्या मुख्यालयात PM मोदींच्या हस्ते सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण

लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्थलांतर केलं होतं. यावेळी लाखो लोकांनी पायी चालत शेकडो किमींचं अंतर पार केलं. यात अनेकांचा मृत्यू देखील झाला. याच मुद्याला धरून प्रियंका गांधींनी भाजपवर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, "लॉकडाऊनच्या काळात लाखो मजूर दिल्लीतून चालवत निघाले होते. त्यावेळी त्यांना भाजप सरकारने बसेस उपलब्ध करून दिल्या नाहीत. मात्र पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या सभेला गर्दी गोळा करण्यासाठी सरकार लोकांचे पैसे खर्च करत आहे."

loading image
go to top