'सप'शी आघाडी करण्यात प्रियांका गांधींची महत्त्वाची भूमिका

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे औचित्य साधून अखेर प्रियांका गांधी या राजकारणात सक्रिय झाल्या असल्याचे काँग्रेस मान्य केले आहे. समाजवादी पक्षासोबत आघाडी करताना प्रियांका यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे औचित्य साधून अखेर प्रियांका गांधी या राजकारणात सक्रिय झाल्या असल्याचे काँग्रेस मान्य केले आहे. समाजवादी पक्षासोबत आघाडी करताना प्रियांका यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांना काँग्रेसमध्ये आणण्यात आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाशी युती करण्यामध्ये प्रियांका गांधी यांचीच भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे माध्यमांशी वारंवार जाहीर निवेदने किंवा विधाने करीत नाहीत. मात्र, त्यांनी विचारपूर्वक केलेल्या ट्विटमधून या निवडणुकांमध्ये काँग्रेसची रणनीती प्रियांका गांधी ठरवत असून त्या नेतृत्व करणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

पटेल यांनी म्हटले आहे की, 'समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी घडवून आणताना काँग्रेसच्या वतीने सामान्य नेते वाटाघाटी करीत होते असे म्हणणे चुकीचे ठरेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रियांका गांधी यांच्यात वरिष्ठ पातळीवर ही चर्चा झाली.'

अखिलेश आणि मुलायम यांच्यातील वादानंतर अखिलेश यांनी काँग्रेसशी आघाडी केली आहे. या दोन्ही पक्षांची आघाडी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. आघाडीची चर्चा बिघडण्याच्या टप्प्यावर आली होती. दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजपलारोखण्यासाठी काँग्रेस आणि सपने अखेर आघाडीचा निर्णय घेतला. 

या आघाडीच्या महत्त्वपूर्ण निर्णयप्रक्रियेत सर्वांत महत्त्वाची भूमिका प्रियांका गांधी यांनी बजावली  असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनीही ट्विटरवरून दुजोरा दिला आहे. प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव एकत्रित प्रचार करण्याची शक्यता आहे.
 

Web Title: priyanka gandhi to lead congress in up