
प्रियंका गांधींनी पहलगाम हल्ल्यावरुन सरकारवर लोकसभेत हल्लाबोल केला. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोणीच घेत नाही, देशातील जनतेची जबाबदारी सरकारची नाही का, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता पण तसे झाले नाही. मग या हल्ल्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल केला. त्या म्हणाल्या की, मुंबईवर जेव्हा 26/11 चा हल्ला झाला तेव्हा देशाच्या गृहमंत्र्यांसह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांनीही राजीनामा दिला होता, कारण ती जनतेच्या प्रति एक जबाबदारी होती. पण आताचे नेतृत्व फक्त चांगल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम करत आहे. यश आणि अपयशाची जबाबदारी घेतले तर नेतृत्व घडते, कारण हा सत्तेचा काटेरी मुकूट आहे.