प्रियांका गांधींनी इटलीत बसून कायद्यावर बोलू नये : योगी

वृत्तसंस्था
रविवार, 30 जून 2019

दिल्ली, इटली किंवा इंग्लंडमध्ये बसून चर्चेत राहण्यासाठी काहीतरी करावे लागेल. त्यामुळे काहींना काही गोष्टी करत राहणे आवडते.

- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश.

नवी दिल्ली : दिल्ली, इटली किंवा इंग्लंडमध्ये बसून चर्चेत राहण्यासाठी काहीतरी करावे लागेल. त्यामुळे काहींना काही गोष्टी करत राहणे आवडते, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर आज (रविवार) केली. तसेच लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव प्रियांका गांधी यांच्या मनाला चांगलाच लागला, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि प्रियांका गांधी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीबाबत वक्तव्य करत योगी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अपयश मिळाले. तसेच प्रियांका यांचे बंधू काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या अमेठी मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे अशा परिस्थितीत इटली, इंग्लंडमध्ये बसून चर्चेत राहण्यासाठी काहीतरी करावे लागेल. म्हणूनच प्रियांका या उत्तरप्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेवर बोलत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Gandhi should not sit in Italy and speak on the law says Yogi Adityanath