esakal | आपल्याला हा देश वाचवायचा आहे : प्रियांका गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Gandhi

मोदी है तो मुमकीन है असे प्रत्येक वृत्तपत्र, बसस्टॉपवर दाखविले जात असले तरी सगळीकडे वाट लागली आहे. कांद्याचे दर 100 रुपयांवर पोहचले आहेत. महागाई, बेरोजगारीने डोके वर काढले आहे.

आपल्याला हा देश वाचवायचा आहे : प्रियांका गांधी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आज रोजगार वाढण्याऐवजी घटत चालले आहेत. आपल्याला या देशाला वाचवायचा आहे. आज देशात असे सरकार आहे, की ज्यामुळे समानता आणि स्वातंत्र्याचा अधिकार राहिला नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर आक्रमक होत काँग्रेसकडून आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात 'भारत बचाओ' रॅलीचे आयोजन केले आहे. दिल्लीत रामलीला मैदानावर 'भारत बचाओ रॅली' घेण्यात आली आहे. या रॅलीद्वारे काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे उपस्थित आहेत.

केंद्र विरुद्ध राज्ये; 'नागरिकत्व' कायद्यास पाच राज्यांचा विरोध 

प्रियांका गांधी म्हणाल्या, की मोदी है तो मुमकीन है असे प्रत्येक वृत्तपत्र, बसस्टॉपवर दाखविले जात असले तरी सगळीकडे वाट लागली आहे. कांद्याचे दर 100 रुपयांवर पोहचले आहेत. महागाई, बेरोजगारीने डोके वर काढले आहे. आपल्या देशाला वाचविण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे. भाजपमुळे देशाच्या संविधानाला धोका आहे. भाजपमुळे 4 कोटी बेरोजगार झाले आहेत. देशासाठी आवाज उठवा. मी उन्नावमधील बलात्कारानंतर जिवंत जाळलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांचे भेट घेतल्यानंतर डोळ्यात अश्रू आले. देश आपल्याला वाचवायचा असेल तर आपण धाडस करणे गरेजेचे आहे. 

भारत बचाओ, भारत बचाओ! रॅली काढत काँग्रेस उतरलं दिल्लीच्या मैदानात

loading image