
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी एक दिवसाच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रयागराज इथं भेट दिली. यावेळी प्रियांका गांधी यांनी संगमावर स्नानही केलं.
प्रयागराज - काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी एक दिवसाच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रयागराज इथं भेट दिली. यावेळी प्रियांका गांधी यांनी संगमावर स्नानही केलं. अरेल घाटावरून नावेतीन त्या संगमात पोहोचल्या होत्या. यावेळी प्रियांका गांधींसोबत मुलगी मिराया आणि इतरही काही लोक होते.
प्रियांका गांधी जेव्हा बोटीतून संगमाकडे जात होत्या त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारने हेलिकॉप्टरमधून संगमावर दाखल झालेल्या भक्तांवर पुष्पवृष्टी केली. तेव्हा प्रियांका गांधी यांच्याही बोटीवर पुष्पवर्षाव झाला.
हे वाचा - मोदी सरकार म्हणजे हम दो, हमारे दो; राहुल गांधींचा हल्लाबोल
मौनी अमावस्येनिमित्त माघ मेळ्यात लाखो भाविक संगमावर दाखल झाले होते. भाविकांनी यानिमित्त गंगेत स्नानही केलं. गुरुवारी पहाटेपासूनच नदीच्या काठावर भाविकांची रीघ लागली होती. प्रयागराज, काशी तसंच अयोध्येत मोठ्या संख्येनं भाविक पोहोचले होते. स्नानासह दान करण्यात येत होते.
हे वाचा - 'जय श्रीराम'वरून अमित शहांचे बंगालच्या जनतेला 'प्रॉमिस'!
उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी काँग्रेसचा एक मोठा चेहरा आहेत. संगमावर प्रियांका गांधींनी केलेलं स्नान हे हिंदुत्त्ववाद्यांना आपल्या बाजुने वळवण्यासाठीचा एक प्रयत्न असल्याचंही म्हटलं जात आहे. बुधवारीसुद्धा प्रियांका गांधी यांनी चिलकाना किसान महापंचायतीत गेल्या होत्या. त्याआधी प्रियांका गांधींनी शाकुंभरी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं.