प्रियांका गांधींची उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांना भेट

Priyanka Gandhi Vadra meets family of Unnao rape victim
Priyanka Gandhi Vadra meets family of Unnao rape victim

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आले होते. त्यानंतर ती 90 टक्के भाजली होती. काल मध्यरात्री  तिचा दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रयांका गांधी यांनी तिच्या कुटुंबियांची भेट घेत तिचे सांत्वन केले आहे. 

''उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांना या काळाशी लढण्यात हिंमत मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपण तिला न्याय देऊ शकलो नाही हे आपल्या सर्वांचे अपयश आहे,'' असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच तिला सुरक्षा का देण्यात आली नव्हती असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेवर गुरुवारी सकाळी न्यायालयाकडे जात असताना नराधमांनी हल्ला करत तिला पेटवून दिले होते. अखेर आज (शनिवार) सुमारे 40 तासांनी तिच्या किंकाळ्या शांत झाल्या असून, तिचा मृत्यूशी लढा अपयशी ठरला आहे. गुरुवारी तिला पेटवून दिल्यानंतर लखनौहून तिला एअर ऍम्ब्युलन्सने दिल्लीला उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, 90 टक्के ती भाजली असल्याने अखेर तिचा मृत्यू झाला आहे. उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्यात ती 90 टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com