पतीच्या मालमत्तेशी संबंध नाही- प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नवी दिल्ली- माझे पती रॉबर्ट वद्रा व त्यांची कंपनी स्कायलाइट हॉस्पिटिलीटीच्या मालमत्तेशी माझा काही संबंध नाही, असे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली- माझे पती रॉबर्ट वद्रा व त्यांची कंपनी स्कायलाइट हॉस्पिटिलीटीच्या मालमत्तेशी माझा काही संबंध नाही, असे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

रॉबर्ट वद्रा यांची कंपनी 'डीएलएफ'वर हरियाणा सरकारचे लक्ष आहे. प्रियांका गांधी यांनी 2006 मध्ये हरियाणातील अमीपुर या गावात पाच एकर शेती विकत घेतली होती. यासाठी त्यांनी 15 लाख रुपये खर्च केले होते. याबाबत प्रियांका म्हणाल्या की, 'माझी आजी व दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी माझ्या नावावर ठेवलेली मालमत्ता व त्यामधून आलेल्या पैशांमधून शेतीची खरेदी केली होती. यामुळे मी खरेदी केलेली मालमत्ता व पती रॉबर्ट वद्रा यांच्या मालमत्तेशी माझा काही संबंध नाही. राजकारण करण्यासाठी माझे नाव जोडले जात आहे.'

शेती ज्या शेतकऱयाकडून खरेदी केली आहे. त्या शेतकऱयाला चेकद्वारे पुर्ण रक्कम दिली आहे. शिवाय, संपूर्ण व्यवहार हा कायदेशीर आहे, असेही प्रियांका म्हणाल्या.

Web Title: priyanka gandhi vadra says no relationship with robert vadras finances