चिंतन शिबिर : अल्पसंख्याकांना काँग्रेस पक्षात ५० टक्के कोटा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

50 percent quota for minorities in the party

चिंतन शिबिर : अल्पसंख्याकांना काँग्रेस पक्षात ५० टक्के कोटा!

राजस्थानच्या उदयपूरमध्ये सुरू असलेल्या चिंतन शिबिरात पक्षाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना पक्षात अधिक प्रतिनिधित्व देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. एससी-एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांसाठी सर्वपक्षीय पदांपैकी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची योजना काँग्रेसने (Congress) तयार केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षाने शनिवारी ही माहिती दिली. (50 percent quota for minorities in the party)

मिशन २०२४ साठी जोरदार तयारी करीत असलेल्या काँग्रेससाठी (Congress) या वंचित घटकांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

हेही वाचा: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांचा राजीनामा; राज्यपालांना राजीनामा सुपूर्द

चिंतन शिबिरात पक्ष संघटनेची पुनर्बांधणी, सततच्या निवडणुकीतील पराभवातून बोध घेणे, चांगले निकाल, नेतृत्व आदी मुद्द्यांवर पक्षाचे पदाधिकारी सखोल चर्चा करीत आहेत. या सर्व मुद्यांवर पक्षाचे नेते के राजू यांनी माहिती दिली.

काँग्रेस (Congress) अध्यक्षांना मदत करण्यासाठी सामाजिक न्याय सल्लागार परिषद स्थापन करण्यावरही चर्चा झाली. ही परिषद सर्व मुद्द्यांवर लक्ष ठेवून आपल्या शिफारसी देईल, असे पक्षाचे नेते म्हणाले. काँग्रेस कार्यकारिणीचे दुर्बल घटकांसाठी (Weak components) दर सहा महिन्यांनी विशेष अधिवेशन होणार आहे.

हेही वाचा: सुशील चंद्र म्हणाले, मतदार यादीशी होणार आधार कार्ड लिंक; लवकरच नियम

राष्ट्रीय धोरणाच्या पातळीवर आपण जात जनगणना केली पाहिजे. खाजगी क्षेत्रात एससी-एसटी आणि ओबीसींना आरक्षण द्यावे. महिला आरक्षण विधेयकात एससी-एसटी महिलांसाठीही तरतूद असावी, असे पक्षनेते के राजू म्हणाले. काँग्रेसचे चिंतन शिबिर १५ मेपर्यंत चालणार आहे. शेवटच्या दिवशी पक्ष सर्व मुद्द्यांवर घेतलेले निर्णय समोर ठेवू शकतात.

निर्णयांना काँग्रेस कार्यकारिणी अंतिम रूप देईल

पक्षातील एक मोठा वर्ग पक्ष संघटनेकडे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांना आणि ओबीसींना पक्षात ५० टक्के आरक्षण देण्याची मागणी अनेक दिवसांपासून करीत होता. चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पक्षनेते के राजू यांनी पक्षाने कोणते निर्णय घेतले हे सांगितले. उदयपूरमध्ये काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराचा रविवारी तिसरा दिवस आहे. दोन दिवस वेगवेगळ्या समित्यांमध्ये जे काही निर्णय होतील, ते रविवारी काँग्रेसच्या कार्यकारिणीसमोर ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयांना काँग्रेस कार्यकारिणी अंतिम रूप देईल.

Web Title: 50 Percent Quota For Minorities In The Party Congress Announcement At The Contemplation Camp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top