
उमेदवारीवरून डीके आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
प्रियंका गांधी कर्नाटकातून राज्यसभा निवडणूक लढवणार? काय म्हणाले डीके शिवकुमार..
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता राज्यात विधान परिषदेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून कर्नाटकातील राजकीय वातारण चांगलंच तापलंय. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष (KPCC Chief) डीके शिवकुमार यांनी आज (सोमवार) सांगितलं की, पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) वाड्रा पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचार करण्यास तयार आहेत, असं त्यांनी नमूद केलंय.
डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी अचानक नवी दिल्लीला भेट दिलीय. ही भेट अशा वेळी झालीय, जेव्हा राज्यातील आगामी एमएलसी निवडणुकांसाठी (MLC Election) हायकमांडला शिफारस केलेल्या संभाव्य उमेदवारांवरून डीके आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
हेही वाचा: आम्ही शहीद कर्नलच्या रक्ताचा बदला घेऊ; राष्ट्रपतींचा थेट इशारा
डीके शिवकुमार पुढं म्हणाले, 'मी पक्षाच्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. आज सायंकाळपर्यंत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.' 3 जून रोजी होणाऱ्या कर्नाटक विधान परिषदेच्या सात जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवार ही शेवटची तारीख आहे. राज्यातील तीनही प्रमुख राजकीय पक्षांनी (काँग्रेस, भाजप आणि जेडीएस) अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
हेही वाचा: Indian Army : कुपवाडच्या जवानाचं पश्चिम बंगालात निधन
कर्नाटकातील अनेक नेते प्रियंका गांधींनी कर्नाटकातून राज्यसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरत असल्याच्या प्रश्नावर शिवकुमार म्हणाले, प्रत्येकाला आपल्या नेत्यानं त्यांच्या राज्यात जावं असं वाटतं, परंतु अद्याप यावर चर्चा झालेली नाहीय. प्रियंका गांधी यांनी निवडणुकांदरम्यान (Karnataka Assembly Election) राज्यात वेळ घालवला पाहिजे, यासाठी त्यांनी सहमती दर्शवली असून राज्यात त्या प्रचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Web Title: Priyanka Gandhi Vadra To Campaign For Assembly Polls In Karnataka Dk Shivakumar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..