
विद्यापीठात शिकवणाऱ्या एका महिला प्राध्यापिकेनं क्लासमध्येच विद्यार्थ्यासोबत लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमधील एका सरकारी विद्यापीठात घडलेल्या या घटनेनंतर वाद निर्माण झालाय. प्राध्यापिकेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिलीय. दरम्यान, प्राध्यापिकेनं हा सगळा एका प्रोजेक्टचा भाग होता. हे नाटक होतं आणि अभ्यासातला भाग होता असं सांगितलंय.