लालूंना धक्का; संपत्ती होणार जप्त

लालूंना धक्का; संपत्ती होणार जप्त

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना प्राप्तिकर विभागाने दणका दिला आहे. लालू यादव यांची तब्बल 3.7 कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात येणार असून, यामध्ये पाटण्यातील काही घरांचाही समावेश आहे. 

पाटण्याच्या जयप्रकाश नारायण विमानतळाजवळ लालूप्रसाद यादव यांच्या मालकीच्या काही इमारती आहेत. या इमारतींची मालकी बेकायदा असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या इमारती जप्त करण्यात येणार आहेत. तसेच बिहार आवामी को-ऑपरेटिव्ह बॅंकेमधील लालूप्रसाद यादव यांच्या कोट्यवधींच्या ठेवीही जप्त करण्यात येणार आहेत. 

एकीकडे लालूप्रसाद यादव यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात जप्त होत असतानाच दुसरीकडे त्यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी बंगल्यात तब्बल 44 एसी लावल्याचा आरोप भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. 

जेडीयू, आरजेडी आणि कॉंग्रेस सत्तेत असताना देशरत्न मार्गावरील उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव बंगला तेजस्वी यादव यांना देण्यात आला होता. या बंगल्यात आता भाजपचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुशील मोदी राहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com