बाळासाहेबांच्या तब्येतीसाठी पाकिस्तानात पैगंबराकडे घालण्यात आलं होतं साकडं

एक काळ असा होता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी थेट पाकिस्तानात प्रार्थना म्हटली जात होती.
Prophet Muhammad nupur sharma Controversy
Prophet Muhammad nupur sharma Controversy

Prophet Muhammad nupur sharma Controversy: भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला जात. या वक्तव्यावरून मुस्लिम देशांमध्ये वादळ उठले आहे. इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, इराण, UAE, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया आणि इंडोनेशियासह किमान 15 देशांनी या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भारताविरुद्ध अधिकृत निषेध केला आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात आजकाल धार्मिक द्वेषाने वातावरण दूषित झालेलं आहे. मात्र एक काळ असा होता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी थेट पाकिस्तानात प्रार्थना म्हटली जात होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी वयाच्या ८६व्या वर्षी दु:खद निधन झाले. याआधी बाळासाहेब यांची प्रकृतीसाठी देशभर प्रार्थना केली जात होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे त्यावेळेचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी आपल्या बाळासाहेबासाठी ‘गेट वेल सून’ असं मेसेज केला होता, आणि बाळासाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी यांनी निरामय आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी मुस्लिम धर्मानं आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर अल्लातालाला साकडं घातले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लवकर बरं करत.

पाकिस्तानातील राज्यकर्त्यांवर धोरणांवर बाळासाहेबांनी नेहमीच जोरदार हल्ला चढवला होता. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांनाही साहेबांनी विरोध केला होता. त्यावेळीस झालं गेलं विसरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने साहेबांना शुभकामना दिल्या होत्या. ‘बालासाहब, आप जल्द अच्छे हो जाए’, आणि मातोश्री’वर एक पुष्पगुच्छ पण पाठवला होता.

पाकिस्तानातील जनतेला बाळासाहेब ठाकरे या नावाबद्दल प्रचंड कुतूहल होते. त्यावेळेस बाळासाहेबांची तब्येत खालावल्याची बातमी पाकमध्येही पसरली आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्याची जनतेला इच्छा होते. त्यांच्या भावनांना पाक क्रिकेट बोर्डानं आपल्या सदिच्छा संदेशातून वाट मोकळी करून दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com