पणजीत वेश्‍या दलालांना सहा दिवस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

फरारी असलेला संशयित व मुख्य सूत्रधार श्‍याम भारती याला यापूर्वी वेश्‍या व्यवसायप्रकरणामध्ये अटक झाली आहे. कळंगुट या परिसरात त्याचे आणखी काही मसाज पार्लर असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. अटक केलेल्या संशयितांच्या चौकशीतून काही माहिती पुढे आली असून त्या दिशेने तपास सुरू आहे.

पणजी : हडफडे येथील ऍबलोन रिसॉर्टमधील मसाज पार्लरवर छापा टाकून वेश्‍या व्यवसायप्रकरणी अटक केलेल्या संशयित जॉन्सन मस्कारेन्हास, मंजुनाथ सोनार व शशांक वारंग या तिघांना म्हापसा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या पार्लरचा मुख्य सूत्रधार श्‍याम राम अवतार भारती याचे आंतरराज्य नेटवर्क आहे. तो सध्या फरारी असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रॅंचचे निरीक्षक विश्‍वेश कर्पे यांनी दिली. 

फरारी असलेला संशयित व मुख्य सूत्रधार श्‍याम भारती याला यापूर्वी वेश्‍या व्यवसायप्रकरणामध्ये अटक झाली आहे. कळंगुट या परिसरात त्याचे आणखी काही मसाज पार्लर असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. अटक केलेल्या संशयितांच्या चौकशीतून काही माहिती पुढे आली असून त्या दिशेने तपास सुरू आहे. काल पार्लरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या सहा तरुणी या अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश व कर्नाटक येथील आहेत. पार्लरची झडती घेण्यात आली त्यावेळी काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. या पीडित तरुणींची समाजसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जबान्या नोंद करण्यात आल्या आहेत. या तरुणींना आलटून पालटून वेगवेगळ्या मसाज पार्लरमध्ये फरारी असलेला वेश्‍या दलाल बदलत होता. हे आंतरराज्य रॅकेट असून उत्तर भारतातील गरीब कुटुंबातील मुलींना नोकरीचे आमिष दाखवून देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यात येत असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. फरारी असलेला संशयित श्‍याम भारती याची गोव्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. अलिशान वाहने घेऊन गोव्यात फिरत असून त्याचे वेश्‍या व्यवसायात आंतरराज्य नेटवर्क असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: prostitution brokers are arrested for six days in panji goa