'हे सालासर बालाजी मोदींचे रक्षण कर'

वृत्तसंस्था
शनिवार, 3 डिसेंबर 2016

सालासर (राजस्थान) - राजस्थानमधील लोकप्रिय सालासर बालाजी मंदिरात उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी "हे सालासर बालाजी, स्वार्थी नेत्यांपासून मोदींचे रक्षण कर' अशी प्रार्थना केली आहे.

सालासर (राजस्थान) - राजस्थानमधील लोकप्रिय सालासर बालाजी मंदिरात उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी "हे सालासर बालाजी, स्वार्थी नेत्यांपासून मोदींचे रक्षण कर' अशी प्रार्थना केली आहे.

यावेळी बोलताना साक्षी महाराज म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचे महत्वाचे काम पूर्ण केले आहे. सीमेवर जवान देशासाठी लढत आहेत. मात्र स्वार्थी नेते संसदेचे कामकाज बंद पाडत आहेत. मोदींच्या प्रयत्नांनी भारत नवी उंची गाठेल.' तसेच मोदी यांनी उत्तर प्रदेशची निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढावी, असा सल्ला साक्षी महाराज यांनी यावेळी दिला. मोदी यांनी नोटाबंदीनंतर एका सभेत बोलताना, "मला कोणी काहीही केले तरीही हा निर्णय मागे घेणार नाही' असे स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर काही तज्ज्ञांनी "मोदींच्या जीविताला धोका आहे की काय?' अशी शंका उपस्थित केली होती. दरम्यान नोटाबंदीच्या निर्णयावर स्पष्टीकरण द्यावे किंवा हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद करत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर साक्षी महाराज यांनी विरोधकांना "स्वार्थी नेते' असे संबोधले आहे. तर "नोटाबंदीला विरोध म्हणजे काळ्या पैशाला विरोध नाही' अशा प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयातील वकिल के टी एस तुलसी यांनी केले आहे.

Web Title: Protect Modi from Selfish leaders - Sakshi Maharaj