भारतीयांना तालिबान्यांचे संरक्षण

काबूल विमातळापर्यंत सुरक्षितपणे पोचविले; भारतीय अधिकाऱ्याचे अनुभवकथन
taliban
taliban sakal

काबूल : तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१६) रात्री घेतल्यानंतर भारतीय दूतावासाच्‍या मुख्य लोखंडी प्रवेशद्वाराबाहेर मशिनगन व ग्रेनेड लाँचरधारी तालिबान्यांची मोठी फौजच उभी होती तर सीमाभिंतीपलीकडे भारतीय राजनैतिक अधिकारी व नागरिक मिळून सुमारे १५० जण चिंतेत होते. तालिबानने काबूलवर पूर्ण नियंत्रण मिळविल्याच्या बातम्यांनी त्यांची अस्वस्थता वाढली होती. (AFGHANISTAN NEWS)

तालिबानी पाकिस्तानसमर्थक मानले जातात. त्यांनी ज्या अफगाण सरकारची सत्ता उलथवून लावली, त्या सरकारशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे दूतावासासमोर एवढे तालिबानी पाहून पुढे काय होणार याची भीती होती. पण ते सूड घेण्यासाठी नाही तर भारतीय अधिकारी व नागरिकांना काबूल विमानतळापर्यंत सुरक्षा पुरविण्यासाठी आले होते. भारतीयांना मायदेशी घेऊन जाण्‍यासाठी भारतीय हवाई दलाचे विमान तयार होते. ‘एफपी’च्या वृत्तानुसार भारतीयांसह तालिबान्यांच्या गाड्या दूतावासातून सोमवारी रात्री उशिरा बाहेर पडल्यानंतर काही तालिबानी दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांकडे पाहून स्मितही केले. ‘एएफपी’ची प्रतिनिधी तेथे उपस्थित होता.

taliban
तालिबानी राज्यात जगू शकत नाही, अफगाणी विद्यार्थ्यांना राहायचंय पुण्यात

शहराच्या ग्रीन झोनमधून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर आणि विमानतळाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका तालिबान्याने मार्गदर्शनही केले. काबूलहून भारतात परतलेला एक अधिकारी म्हणाला की, तालिबानने संपूर्ण देशाचा ताबा घेण्यापूर्वी २०० किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी अफगाणिस्तान सोडले होते. पण जेव्हा आम्ही दुसऱ्या गटाला बाहेर काढत होतो, त्यावेळी आम्हाला तालिबान्यांचा सामना करावा लागला. त्यांनी आम्हाला ‘ग्रीन झोन’मधून जाण्यास मनाई केली. त्यावेळी तालिबान्‍यांशी संपर्क साधून आमच्या ताफ्याला बाहेर काढण्यासाठी संरक्षण पुरविण्‍याचे आवाहन करण्याचा निर्णय घेतला. गडद अंधारात पडल्यावर आमच्या मोटारी पाच किलोमीटरवरील विमानतळाकडे मार्गस्थ झाल्या.

taliban
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीसंदर्भात उपमुख्यमंत्र्याची घोषणा

मायदेशी परतल्याचा खूप आनंद झाला. भारत हा नंदनवन आहे.

- शिरीन पाठारे, कर्मचारी, एअर इंडिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com