NEET: स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याकडून बहिष्कार

mk stalin
mk stalinesakal

चेन्नई- तामिळनाडूमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या समारंभावरुन वादाला सुरुवात झाली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यपाल आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. NEET परीक्षा पास होऊ न शकल्याने एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर मुलाच्या वडिलांनीही गळपास घेऊन आत्महत्या केली. यावरुन तमिळनाडूमध्ये खदखद निर्माण झाली आहे. स्टॅलिन यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. (protest against neet indifference and overreach MK stalin decided to boycott the At Home Reception hosted by Governor Ravi on Independence Day)

NEET परीक्षेला राज्यातून वगळण्यासाठी तामिळनाडू सरकारने विधेयक राज्यपाल रवी यांच्याकडे पाठवले होते. पण, राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी केली नाही. तसेच विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मूर्मी यांच्याकडे पाठवून दिले. यावर संताप व्यक्त करत स्टॅलिन यांनी म्हटलं, सलग सात वर्षाच्या संघर्षाचा राज्यपालांनी अपमान केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजुरी द्यावी यासाठी त्यांना पत्र लिहिणार आहे.

mk stalin
Raj Thackeray: 'सगळे आतून एकमेकांना मिळालेले'; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक संपली

तमिळ विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे

तमिळ विद्यार्थ्यांचे भविष्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही यावर्षी इथे आणि पुढच्या वर्षी दुसरीकडे जाणारे नाही. आम्ही सत्तेत असू किंवा नसू लोकांसाठी आवाज उठवत राहू, असं स्टॅलिन म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राज्यपाल विश्वविद्यालयांना नष्ट करत आहेत. विधेयक त्यांनी मंजूर केलेलं नाही. त्यामुळे मी त्यांची निंदा करतो. त्यामुळेच मी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आहे.

mk stalin
Manipur Violence: मणिपूर विषयावर पंतप्रधान मोदींची भूमिका देशासाठी चिंतेची; शरद पवारांचे मत

NEET परीक्षा पास होऊ न शकल्याने मुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. त्याच्या पुढच्याच दिवशी मुलाच्या वडिलांनीही जीवन संपवले. जगदीशस्वरन २०२२ मध्ये ४२७ गुण घेऊन बारावी पास झाला होता. त्याने दोनदा परीक्षा दिली पण तो NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा पास होऊ शकला नाही. शनिवारी, वडीलांनी फोन केल्यास त्याने उचलला नाही. तो राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या वडीलांना दु:ख सहन न झाल्याने त्यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर राज्यात संतापाची भावना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com