CAA : जाफ्राबाद मेट्रो स्टेशनबाहेर महिलांचे आंदोलन; पोलिस तैनात

CAA : जाफ्राबाद मेट्रो स्टेशनबाहेर महिलांचे आंदोलन; पोलिस तैनात

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) आंदोलन आणखी तीव्र होताना दिसत असून, आज (रविवार) सकाळी दिल्लीतील जाफ्राबाद मेट्रो स्टेशनबाहेर महिलांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहे, तर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने (डीएमआरसी) ट्विट करत आंदोलनामुळे मेट्रो स्टेशन आणि या स्थानकावर एकही रेल्वे थांबणार नसल्याचे म्हटले आहे. सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनाचा फटका आता मेट्रो स्थानकांनाही बसताना दिसत आहे. शनिवारी रात्री जाफ्राबाद मेट्रो स्थानकाबाहेर महिला एकत्र येण्यास सुरवात झाली. मोठ्या प्रमाणात महिला एकत्र आल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांनी महिलांना तेथून हटण्याचे आवाहन केले आहे. 

दिल्लीत सीएए विरोधात आंदोलन होत असलेले नवे ठिकाण म्हणून जाफ्राबाद समोर आले आहे. 500 हून अधिक महिला याठिकाणी एकत्र आल्या आहेत. दिल्लीतील शाहिनबाग येथे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु असून, सीएए हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com