Agneepath Protest : आंदोलकाने थांबवली मुख्यमंत्र्यांची कार; मग...

Protesters stopped Chief Minister Bhagwant Manns car
Protesters stopped Chief Minister Bhagwant Manns carProtesters stopped Chief Minister Bhagwant Manns car

चंदीगड : अग्निपथ योजनेचा (Agneepath Protest) विरोध करणाऱ्या युवकांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्याशी चर्ची करण्यासाठी त्यांचा ताफा रोखला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा (car) थांबवला. व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री पंजाबमधील रोड शोमध्ये नागरिकांना अभिवादन करताना दिसत आहेत. ते गाडीच्या सनरूफमध्ये उभे असताना काळी टी-शर्ट घातलेला माणूस हात हलवून बोलण्याचे आवाहन करताना दिसतो. आपने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ताफ्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. (Protesters stopped Chief Minister Bhagwant Manns car)

ताफा थांबल्यानंतर तरुण मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे जातो. तरुण मुख्यमंत्री मान (Bhagwant Mann) यांच्याशी हस्तांदोलन करतो आणि म्हणतो अग्निपथ योजना लागू करण्यापूर्वी सर्व नेत्यांनी भेटून चर्चा करावी. अग्निपथ योजनेवर चर्चा करण्यासाठी सर्व खासदार भेट घेईल तेव्हा मी स्वतः तिथे जाईन, असे आश्वासन मुख्यमंत्री मान यांनी तरुणाला दिले.

Protesters stopped Chief Minister Bhagwant Manns car
"उद्या भाडोत्री सरकारही आणणार का?" 'अग्निपथ'वरून CM ठाकरेंचा केंद्राला टोला

विरोधी पक्षांनी बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये लष्करी उमेदवारांच्या हिंसक निदर्शनांचा निषेध केला आहे. परंतु, केंद्राने चर्चेसाठी बैठक घ्यावी या मागणीचे समर्थन केले आहे. सशस्त्र दलातील भरतीमध्ये असा आमूलाग्र बदल करण्याची घोषणा करण्यापूर्वी सरकारने इतर नेत्यांचा सल्ला घ्यायला हवा होता, असेही विरोधकांचे म्हणणे आहे.

काही राज्यांमध्ये अग्निपथविरोधात (Agneepath Protest) निदर्शने सुरू आहेत. उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि बिहारमध्येही आंदोलनांना उग्र वळण लागले आहे. आंदोलनादरम्यान केंद्राने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी दहा टक्के कोटा असेल. ज्यामुळे तटरक्षक आणि संरक्षण नागरी पदांवर आणि सर्व १६ संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये संधी मिळेल. हे आरक्षण माजी सैनिकांसाठीच्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com